Ad will apear here
Next
साहिलच्या इच्छाशक्तीला ठाणेकरांचा सलाम!
ठाणे : कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असलेल्या साहिल संजय या ठाण्यातील विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के यश मिळवले आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तो बबनशेठ पडवळ विद्यालयाचा विद्यार्थी आहे.

त्याची सातवीची परीक्षा सुरू असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. 
त्या वेळी तो वडिलांवर अंत्यसंस्कार करून तसाच परीक्षेला गेला होता. त्याही वेळी तो वर्गात पहिला आला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची परीक्षाच सुरू झाली. उजाडणाऱ्या प्रत्येक दिवशी येणारे नवे आव्हान स्वीकारत त्याने पुढची वाटचाल सुरूच ठेवली. त्याच्या घरात एकटी आईच कमावणारी; मात्र साहिलने दहावीत उज्ज्वल यश मिळवून तिची मान उंचावली आहे. 

साहिलच्या आईने एकाकी झुंज देत साहिलची मोठी बहीण सायली आणि साहिलचं शिक्षण चालू ठेवलं. दररोज अडचणींवर मात करून मिळणाऱ्या तुटपुंज्या सुविधांचा बाऊ न करता चमकलेल्या इच्छाशक्तीला ठाणेकरांनी सलाम केला आहे.  साहिल अष्टेडो या खेळातला राज्य पातळीवरचा खेळाडूही आहे. आजवर त्याच्या नावावर तीन जिल्हास्तरीय सुवर्णपदके असून, राज्य संघातही तो खेळला आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZINBD
Similar Posts
ठाण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात खासगी व लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या २० एमएलडी क्षमतेच्या पाणी विक्षारण आणि १० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली. अशा पद्धतीचे प्रकल्प राबविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे
ठाणे शहरात आरोग्य शिबिरे,औषध फवारणी ठाणे :   नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर साथीचे आजार फैलावू नयेत, यासाठी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत तातडीने आरोग्य शिबिरे घेण्याचे आदेश  दिले. त्यानुसार आरोग्य विभागाच्यावतीने शहरात ठिकठिकाणी जवळपास २२ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या
स्वामी चिद्विलासानंदाचा जन्मदिन महोत्सव साजरा ठाणे : आध्यात्मिक गुरू स्वामी चिद्विलासानंद यांचा जन्मदिन सोहळा तानसा खोऱ्यातील आदिवासींनी २४ जून रोजी उत्साहात साजरा केला. या निमित्ताने प्रसाद चिकित्सा धर्मदाय संस्थेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात स्थानिक आदिवासी, महिला आणि बालकवर्गाचा विशेष सहभाग होता. या महोत्सवाची सुरुवात वृक्ष लागवड अभियानाने झाली
विविध प्रकल्पांचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन ठाणे : इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर, वर्किंग वूमन्स हॉस्टेल आणि ग्रँड सेंट्रल पार्क या शहराच्या लौकिकात भर टाकणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कम्युनिटी पार्क आणि https://www.maha.ooo/ या वेबसाइटचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि सार्वजनिक

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language